रेशन धान्य दुकानदारांच्या ई-पाॅस मशीन बंद… रेशन कार्डधारक धान्यापासून वंचित शिवसेना (उबाठा) ची ऑफलाईन धान्य देण्याची मागणी

मलकापुर :- तालुक्यातील रेशन धान्य दुकानदारांच्या ई-पॉस मशीन बंद असल्याने रेशन दुकानदार रेशन कार्ड धारकांना जून महिन्याचे धान्य वितरित करीत नसल्याने रेशन कार्ड धारकांवर उपासमारीची वेळ आली आहे.आज 24 तारीख असून रेशन दुकानदारांना धान्य देण्याची मुदत वाढवून देण्याची व ऑफलाईन धान्य वितरण करण्याची मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांच्या नेतृत्वात तहसीलदार तथा पुरवठा अधिकारी यांना एका निवेदनाद्वारे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे. निवेदनात नमूद केले आहे की ही ई-पाॅस मशीन बंद असल्याने रेशन दुकानदार ऑफलाइन धान्य देत नसल्याने रेशन कार्डधारकांना रेशन दुकानावर चकरा मारून उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे रेशन कार्ड धारकांनी मशीन सुरळीत सुरू होईपर्यंत जून महिन्याचे धान्य ऑफलाईन वितरित करावे व मशीन व्यवस्थित सुरू झाल्यावर थँम्स घ्यावा व दुकानदारांना सहा दिवसात धान्य वाटप करता येत नसल्याने त्यांना वेळ वाढवून देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, शिवसेना शहरप्रमुख हरिदास गणबास, युवा सेना शहरप्रमुख मंगेश सातव,वाहतूक सेना शहर प्रमुख इम्रान लकी, स्वप्निल पुरुषोत्तम चोपडे, संदीप पंडितराव गावंडे, गजानन वामन चोपडे, गणेश अवचितराव गावंडे, अरुण अजाबराव गावंडे, सागर कन्हैयालाल आंबेकर, सुनील कन्हैयालाल आंबेकर, पद्माबाई मोरे, गौरव सुरेश आंबेकर, मिलिंद प्रकाश आंबेकर, अरुण बाळकृष्ण आंबेकर, गणेश प्रकाश चोपडे, उल्हास प्रकाश चोपडे, योगेश सातव, विभाग प्रमुख सत्तार शहा, वसीम अन्सारी, रफिक भाई पजायेवाले सह शिवसेना पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या सह्या नमूद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!