आरेगावात घर व दुकान फोडून चोरी; ५५ हजारांचा ऐवज लंपास

डोणगाव :- तालुक्यातील आरेगाव येथे अज्ञात चोरट्यांनी घरासह किराणा दुकानावर डल्ला मारत सुमारे ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २२ ते २३ एप्रिलच्या मध्यरात्री ही चोरी झाली. पंडित वामनराव मोरे यांच्या घरी त्यांच्या नातेवाईक मुक्कामासाठी आले होते. दरम्यान, शेजारी राहणाऱ्या सविता मोरे यांच्या निदर्शनास घराचे दार उघडे असल्याचे आल्यानंतर त्यांनी मोरे यांना याची माहिती दिली.
यानंतर घराची पाहणी केली असता, मावशी राहत असलेल्या खोलीचे कुलूप तोडून लोखंडी पेटीत ठेवलेले सुमारे एक तोळ्याचे सोन्याचे दागिने (अंदाजे २७ हजार रुपये) आणि १० हजार रुपयांची रोख रक्कम चोरीस गेल्याचे आढळले.
याच दरम्यान शेख रहीम शेख सत्तार यांच्या किराणा दुकानातही चोरी झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी डोणगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!