भरदिवसा घर फोडून ५८ हजारांचा ऐवज लंपास, एसबीआय कॉलनीतील घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
शेगाव : घरमालक दुपारच्या सुमारास बाहेर गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून दागिने, रोख रक्कम व मौल्यवान वस्तू असा सुमारे ५८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. शेगाव शहरातील पारीजात नगर परिसरातील एसबीआय कॉलनीत ३० जुलै रोजी ही घटना घडली. भरदिवसा झालेल्या या घरफोडीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रदीप रामदास परळीकर (५८), सेवानिवृत्त गटनिदेशक,…
