Headlines

धुऱ्याच्या वादातून मायलेकाला मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा, मोताळा येथील घटना

मोताळा : शेताच्या बांधाची हद्द आणि सामाईक धुरा कोरण्याच्या किरकोळ कारणातून सुरू झालेला वाद चांगलाच चिघळला. जाब विचारण्यासाठी गेलेल्या ५७ वर्षीय महिलेसोबत धक्काबुक्की व लोटपाट करण्यात आली, तर आईसोबत झालेल्या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तिच्या मुलाला तिघांनी लाठ्या-काठ्यांनी मारहाण केल्याची घटना टाकळी घडेकर येथे घडली. याप्रकरणी धामणगाव बढे पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. टाकळी…

Read More

विहिरीत कुजलेल्या अवस्थेत नर बिबट्याचा मृतदेह; पिंप्रीगवळी शिवारातील घटना; मृत्यूचे कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार

पिंप्रीगवळी : शेतातील विहिरीजवळ आलेल्या दुर्गंधीचा शोध घेतल्यानंतर विहिरीत कुजलेल्या अवस्थेत नर बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने पिंप्रीगवळी शिवारात खळबळ उडाली. ७ सप्टेंबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मृतदेह विहिरीबाहेर काढून पंचनामा केला. बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे गूढ शवविच्छेदन अहवालानंतरच उकलणार आहे. शेतकरी राजेंद्र भगवान पवार हे…

Read More

गांजाच्या अवैध विक्रीचा पर्दाफाश; ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त, १९ वर्षीय तरुण ताब्यात, मोताळ्यात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

मोताळा : शहरातील पाचपीर दर्गा परिसरात सुरू असलेल्या गांजाच्या बेकायदेशीर विक्रीचा बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. ६ सप्टेंबरच्या रात्री करण्यात आलेल्या धडक कारवाईत १ किलो १७० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी १९ वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. जप्त मुद्देमालाची किंमत ५८ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. मोताळा शहरातील पाचपीर…

Read More

“तू दिसायला चांगली नाहीस” असे म्हणत ५० हजारांसाठी नवविवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या ७ जणांवर गुन्हा

मोताळा : सुखी संसाराची स्वप्ने उराशी बाळगून सासरच्या उंबऱ्यात पाऊल ठेवलेल्या १८ वर्षीय नवविवाहितेच्या वाट्याला मात्र छळ आणि अपमान आला. तू दिसायला चांगली नाहीस, असे हिणवत माहेरहून ५० हजार रुपये आणण्याची मागणी करीत शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी पतीसह सासरकडील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मोताळा येथील सुलतानाबी शेख अजीम या विवाहितेचा…

Read More

मोताळाः लहान मुलाच्या पाळण्याच्या दोरीला गळफास; ३५ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

मोताळा : शहरातील ख्वाजा गरीब नवाज नगर परिसरात एका ३५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात लहान मुलाच्या पाळण्याच्या दोरीला रुमालाच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी, २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली. फरजाना बी सलीम शाह असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत सलमान शाह इब्राहिम शाह (रा. वृंदावन…

Read More

भरधाव पिकअपची दुचाकीला समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू

मोताळा : बुलढाणा-मोताळा मार्गावर राजूर गावाजवळील पुष्ठा फॅक्टरीच्या वळणावर भरधाव बोलेरो पिकअपने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मोताळा येथील ४६ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुचाकीवरील अन्य दोघे जखमी झाले. ही घटना २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली असून, मृत्यूनंतर २९ ऑगस्ट रोजी बोराखेडी पोलिसांनी पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत…

Read More

“आपण दोघे पळून जाऊन लग्न करू” असे म्हणत आयटीआयला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचे अपहरण; नळगंगा धरण परिसरात विनयभंगाचा आरोप

मोताळा : आयटीआय कॉलेजला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला दुचाकीवर बळजबरीने बसवत अपहरण केल्याची धक्कादायक घटना मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आली आहे. आरोपीने मुलीला नळगंगा धरण परिसरात नेऊन तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी एका २१ वर्षीय तरुणाविरुद्ध पोक्सो आणि अॅट्रॉसिटी कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे….

Read More

भरधाव दुचाकीची धडक; कुटुंबाचा आधार ठरलेल्या २६ वर्षीय युवकाचा मृत्यू

मोताळा : भरधाव आणि निष्काळजीपणे चालविलेल्या दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या २६ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पाच वर्षांपूर्वी वडिलांचे छत्र हरपल्यानंतर मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या दर्शन विष्णू सुरपाटणे याच्या आकस्मिक मृत्यूने सुरपाटणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना मोताळा शहरातील गणपती नगर परिसरात ८ ऑगस्ट रोजी घडली. शनिवार, ८ ऑगस्ट रोजी सकाळी…

Read More

कोथळी शिवारातील विहिरीत ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह; दोन दिवसांपासून होते बेपत्ता

मोताळा : तालुक्यातील कोथळी शिवारातील एका विहिरीत ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. गोपाल गंगाराम गायकवाड (रा. इब्राहीमपूर) असे मृताचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाल गायकवाड हे दोन दिवसांपूर्वी घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर ते घरी परतले नसल्याने कुटुंबीय त्यांचा…

Read More

शेलापूरमध्ये मोटार रिवाइंडींग दुकान फोडून ३५ हजारांचा ऐवज लंपास, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

मोताळा :- तालुक्यातील शेलापूर येथे चोरट्यांनी मोटार रिवाइंडींगचे दुकान फोडून ग्राहकांच्या दुरुस्तीसाठी ठेवलेल्या मोटारींसह विविध साहित्य असा एकूण ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बोराखेडी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील चिराग प्रकाश होले…

Read More
error: Content is protected !!