भरधाव ट्रकचा कट; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोघे जखमी

मोताळा : बुलढाणा – मलकापूर रोडवर भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार (१० एप्रिल) रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्रिमूर्ती पेट्रोलपंपाजवळ घडली. या अपघातामुळे परिसरात काही काळ हळहळ व्यक्त करण्यात आली. मृत तरुणाचे नाव सचिन हनुमान तिवारी (रा. राजूर) असे असून पांडुरंग दोडे…

Read More

शेतकऱ्याच्या मुलाची MPSC मध्ये झेप; पवन नेमाडेची कर सहायक पदावर निवड

मोताळा : अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबात वाढलेल्या पवन कैलास नेमाडे यांनी प्रचंड संघर्ष आणि जिद्दीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा परीक्षा २०२४ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. OBC प्रवर्गातून राज्यात चौथा क्रमांक मिळवत त्यांनी कर सहायक (Tax Assistant) पदावर निवड मिळवली आहे. शेतकरी आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करत पवन यांनी गावासह परिसराचे…

Read More

२ लाखांचा गांजा जप्त; २१ वर्षीय युवक जेरबंद, मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोलिसांची कारवाई

मोताळा : – अमली पदार्थांविरोधातील कारवाईत बोराखेडी पोलिसांनी मोठी कारवाई करत जवळपास दोन लाख रुपयांचा गांजा जप्त केला असून एका २१ वर्षीय युवकाला अटक केली आहे. ही कारवाई रविवारी ५ एप्रिल रोजी दुपारी सुमारे ४ वाजता करण्यात आली. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोराखेडी पोलिसांना स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती (कृउबा) परिसरातील कॉटन मार्केट भागात अजय…

Read More

वादळी वाऱ्यासह गारपीट; मलकापूर-मोताळा तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान

मलकापूर :- मलकापूर व मोताळा तालुक्यात गेल्या काही दिवसांत वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अवघ्या दहा दिवसांत दुसऱ्यांदा झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. ३० मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसासोबत गारांचा मारा झाल्याने मका, ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. काढणीच्या उंबरठ्यावर असलेली पिके वादळ आणि…

Read More

पाणी मागण्याचा बहाणा करून महिलेची सोन्याची पोत लंपास; पोलिसांनी आरोपी महिलेला अटक

मोताळा ( बोराखेडी ):- पाणी मागण्याचा बहाणा करून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे पेंडल असलेली पोत चोरून नेणाऱ्या एका महिलेला बोराखेडी पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत अटक करत चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 11 मार्च 2026 रोजी वरुण ओंकार असोलकर (रा. मोताळा) यांनी बोराखेडी पोलीस…

Read More

टाकळी वाघजाळ येथे 29 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या!

मोताळा : – तालुक्यातील टाकळी वाघजाळ येथे एका 29 वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. 10) सायंकाळी उघडकीस आली. अंकुश प्रल्हाद हरमकार असे मृत युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश हरमकार यांनी त्यांच्या घरातील खांबाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. सायंकाळी सुमारे पाच वाजताच्या सुमारास ही बाब कुटुंबीयांच्या निदर्शनास आली. घटनेची…

Read More

अंत्री येथे 24 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या!

मोताळा : – तालुक्यातील अंत्री येथे 24 वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. 9 ) सायंकाळी उघडकीस आली. या प्रकरणी बोराखेडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तेजस मोहन जवरे (वय 24, रा. अंत्री) असे मृत युवकाचे नाव आहे. याबाबत चंद्रकांत रविदास जवरे यांनी पोलिसांत माहिती दिली. रविवारी…

Read More

ट्रीपला जाऊन येतो म्हणत घरातून निघाला; तळणीचा ३० वर्षीय तरुण दुचाकीसह बेपत्ता!

  मोताळा :- ट्रीपला जाऊन येतो असे सांगून घरातून निघालेला ३० वर्षीय तरुण दुचाकीसह बेपत्ता झाल्याची घटना तालुक्यातील तळणी परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी बोराखेडी पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तळणी येथील जनार्धन गणपत कुयटे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांचा मुलगा गजानन जनार्धन कुयटे (वय…

Read More

किरकोळ वादातून रक्तरंजित शेवट; मोताळा तालुक्यातील पोफळीत तरुणाचा खून! पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा

  मोताळा : तालुक्यातील पोफळी गावात किरकोळ वादातून ३२ वर्षीय तरुणाची मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना २७ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत तरुणाचे नाव अनिकेत ऊर्फ गणेश निवृत्ती सुरडकर (वय ३२) असे आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास पोफळी शिवारातील विलास राजाराम…

Read More

शेलगाव बाजारात तूरचोरी; दोघे रंगेहात पकडले, दोघे फरार

  धामणगाव बढे : – मोताळा तालुक्यातील शेलगाव बाजार येथे तुरीच्या पोत्यांची चोरी करणाऱ्या चौघांच्या टोळीचा पर्दाफाश झाला असून, दोन आरोपींना रंगेहात पकडण्यात आले आहे. उर्वरित दोघे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत. या प्रकरणी धामणगाव बढे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे. शेलगाव बाजार येथील अमोल ज्ञानदेव पाटील (वय ४७) यांनी आपल्या…

Read More
error: Content is protected !!