Headlines

गोठ्यातून म्हैस चोरी; डोणगावात चोरीचे सत्र सुरूच; पशुधन, कृषीपंप व केबल चोरीने शेतकरी त्रस्त; पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह

डोणगाव : शेतात राबून पिकांची राखण करण्यासोबतच दूध व्यवसायातून संसाराचा गाडा चालविणाऱ्या शेतकऱ्यांच्या पशुधनावरच चोरट्यांनी डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. डोणगाव परिसरात मागील दोन महिन्यांपासून मोटरसायकल, घरफोडी, म्हशी, शेळ्या, कृषीपंप व केबल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक चोरीच्या घटनांची नोंद होऊनही ठोस तपास किंवा चोरट्यांचा माग काढण्यात पोलिसांना…

Read More

एकाच अपघातात जिवलग मित्रांचा अंत; एकाच वेळी निघाल्या अंत्ययात्रा, डोणगाव झाले सुन्न

डोणगाव : एकत्र फिरणारे, एकत्र हसणारे आणि कायम एकमेकांच्या सोबत असलेले दोन जिवलग मित्र नियतीच्या एका भीषण अपघाताने कायमचे दूर झाले. मेहकरकडे दुचाकीने निघालेल्या डोणगावातील दोन तरुणांचा कंटेनरच्या जोरदार धडकेत मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी (दि. २) रात्री साडेसात ते पावणेआठच्या सुमारास जालना बायपास ते पुलगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ सी वर घडली. शेख साहिल…

Read More

समृद्धीवर पुन्हा अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी व्यक्ती ठार

डोणगाव : समृद्धी महामार्गावर चॅनेल क्रमांक २७१ जवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या भीषण धडकेत एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना १ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. धडक इतकी भीषण होती की मृतदेहाची अवस्था विद्रूप झाली असून अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. अपघाताची माहिती डायल ११२ वर मिळताच डोणगाव पोलिस, महामार्ग पोलिस, रुग्णवाहिका व वैद्यकीय…

Read More

झोपेच्या डुलकीने घेतला चालकाचा जीव; समृद्धी महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात

डोणगाव : पहाटेच्या सुमारास वाहन चालविताना चालकाला लागलेली झोपेची डुलकी जीवावर बेतली. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटून समोरून जाणाऱ्या अज्ञात वाहनाला मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत क्लीनर किरकोळ जखमी झाला असून ट्रकच्या कॅबिनचा अक्षरशः चुराडा झाला. समृद्धी महामार्गावरील डोणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत नागपूर कॉरिडॉरवरील चैनेज क्रमांक २६९.४०…

Read More

विनापरवाना पेट्रोल साठ्यावर डोणगाव पोलिसांचा छापा; २७० लिटर इंधन जप्त

डोणगाव : अंजनी बु. (ता. मेहकर) येथे विनापरवाना पेट्रोलचा साठा करून त्याची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर डोणगाव पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत २७० लिटर पेट्रोलसह एकूण ३४ हजार २६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपनीय माहितीच्या आधारे २६ जुलै रोजी अंजनी…

Read More

मुख्य चौकातील सराफा दुकान फोडण्याचा प्रयत्न; डोणगावातील चोऱ्यांच्या मालिकेने व्यापारी धास्तावले

डोणगाव : शहरातील बंद घरे आणि व्यावसायिक आस्थापनांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांनी आता मुख्य चौकातील सराफा दुकानावर डल्ला मारण्याचा प्रयत्न केल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यरात्री घडलेल्या या प्रकारात चोरीचा प्रयत्न फसला असला तरी सलग घडणाऱ्या घटनांमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. माहितीनुसार, मुख्य चौकातील अमोल विष्णू घोडके यांच्या मालकीच्या ‘सूरज ज्वेलर्स’…

Read More

शेतजमिनीच्या वादातून शेतकऱ्याला धमकी; डोणगाव पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल!

डोणगाव :- तालुक्यातील उमरा देशमुख येथे सुरू असलेल्या शेतजमिनीच्या न्यायालयीन वादातून एका शेतकऱ्याला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी डोणगाव पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष गिरीधर डोळस (वय ४०, रा. उमरा देशमुख) हे शेती व्यवसाय करतात. त्यांच्या शेतालगत राहणाऱ्या नातेवाईकांशी जमिनीच्या…

Read More

दुचाकीवर बसण्यास नकार; वृद्धावर काठीने हल्ला, जीवे मारण्याची धमकी, डोणगाव पोलिसांत गुन्हा दाखल!

डोणगाव : – पायी घरी जात असलेल्या ६० वर्षीय वृद्धाला दुचाकीवर बसण्यास नकार दिल्याच्या कारणावरून काठीने बेदम मारहाण केल्याची घटना हिवरा साबळे फाटा येथे घडली. या प्रकरणी डोणगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मदन तुकाराम पोहरे (वय ६०, रा. जवळा, ता. मेहकर) हे २३ मे रोजी दुपारी सुमारे…

Read More

पोलीस ठाण्यासमोर युवकाचे विषप्राशन; कारवाईच्या विलंबाचा आरोप

डोणगाव :- कौटुंबिक वादाच्या तक्रारीवर पोलिसांकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप करत एका युवकाने थेट डोणगाव पोलीस स्टेशनच्या आवारात विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली. या घटनेमुळे पोलीस ठाणे परिसरात काही काळ एकच खळबळ उडाली होती. डोणगाव येथील साजन शहा अब्दुल शहा याचे पत्नी व सासरच्या मंडळींसोबत कौटुंबिक वाद…

Read More

डोणगावात कोठार फोडून ३० क्विंटल हळदीच्या बेण्याची चोरी; शेतकऱ्यांमध्ये भीती!

डोणगाव :- येथील एका कोठाराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ३० क्विंटल हळदीच्या बेण्यावर हात साफ केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत सुमारे ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठल विश्वनाथ भुतेकर (वय ४४, रा. डोणगाव) यांनी पेरणीसाठी विकत घेतलेले हळदीचे बेणे गावातील राजेश रमेश सावजी यांच्या कोठारात…

Read More
error: Content is protected !!