आसलगाव : घराजवळील सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यासाठी मोटर सुरू करण्याचा प्रयत्न एका २७ वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतला. विद्युत बोर्डात वायर जोडत असताना अचानक विजेचा जोरदार धक्का बसल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास जळगाव जामोद तालुक्यातील पळशी सुपो येथे घडली. बादल जगदेव अंभोरे (वय २७, रा. पळशी सुपो) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बादल अंभोरे हे घराजवळील सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यासाठी मोटर सुरू करण्याच्या तयारीत होते. त्यासाठी त्यांनी घरातून विद्युत वायर विहिरीपर्यंत नेली होती. विहिरीवरील विद्युत बोर्डाच्या प्लगमध्ये वायर जोडत असताना अचानक त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. विजेच्या धक्क्याने ते बोर्डापासून दूर फेकले गेले.