Headlines

विवरा ग्रामवासियांच्या शेत रस्त्याच्या अतिक्रमणावर तोडगा न निघाल्याने ग्रामस्थ 15 ऑगस्ट रोजी च्या आमरण उपोषणावर ठाम

मलकापुर:- तालुक्यातील ग्राम विवरा येथील विवरा – रणगांव रस्त्याचे काम दोघा-तिघा शेतकऱ्यांनी अडविले असून ग्रामस्थांना या अपूर्ण रस्त्याने शेतात ये -जा करण्यासाठी त्रास होत असल्याने ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना दि.03 ऑगस्ट रोजी निवेदन देत दहा दिवसांत अपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण न केल्यास दि. 15 ऑगस्ट 26 रोजी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने तहसीलदार समाधान…

Read More

उमाळी-वरखेड रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू, पती गंभीर जखमी

मलकापूर : अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी उमाळी-वरखेड रस्त्यावर घडली. या अपघातात महिलेचा पती गंभीर जखमी झाला असून, मलकापूर ग्रामीण पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नांदुरा येथील मनोज लक्ष्मण राणे हे पत्नी रजनी राणे यांच्यासोबत दुचाकीने निंबादेवी येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शनानंतर ते दाताळा…

Read More

काटी गावात मध्यरात्री दरोडेखोरांचा धुमाकूळ; चोरांचा पाठलाग करणाऱ्या शेतकऱ्याचा निर्घृण खून, मलकापूर तालुक्यात खळबळ; एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी, लाखोंच्या मुद्देमालाची चोरी

मलकापूर : मलकापूर तालुक्यातील काटी गावात रविवारी पहाटे दरोडेखोरांनी घातलेल्या धुमाकुळामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास गावात चोरीच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात दरोडेखोरांनी तीन ठिकाणी घरफोडी केल्याची प्राथमिक माहिती असून, चोरांना पकडण्यासाठी त्यांचा पाठलाग करणाऱ्या रायसिंग सिताराम सोलंकी (वय ५२) यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सोलंकी यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. मिळालेल्या…

Read More

पुराच्या पाण्यात तीन म्हशींचा बळी; शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान, अचानक आलेल्या महापुराने संसाराचा आधार हिरावला; मडाखेड खुर्द येथील शेतकरी हवालदिल

जळगाव जामोद : डोळ्यांसमोर पाण्याचा लोंढा वाढत गेला आणि काही कळायच्या आत गोठ्यातील जनावरे पुराच्या पाण्यात अडकली. जीव वाचविण्यासाठी धावपळ सुरू असतानाच तीन म्हशी पाण्यात बुडाल्या. या दुर्दैवी घटनेत शेतकरी अशोक रामेश्वर बाराहाते यांचे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले असून, पुराच्या पाण्याने त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा आधारच हिरावून घेतला आहे. जळगाव जामोद तालुक्यातील मडाखेड…

Read More

प्रति शेगाव घिर्णी गावाचा 14 तास तालुक्याशी संपर्क तुटला; जनजीवन विस्कळीत

मलकापूर: मागील दोन दिवसांपासून म्हणजे 30 आणि 31 जुलै 2026 रोजी मलकापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार तालुका आणि शहरात जोरदार पावसाची नोंद झाली. सलग पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला. नदीकाठच्या घरांमध्ये, शाळा, दुकाने, मेडिकल आणि गुरांच्या वाड्यांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. शेतीचेही मोठे नुकसान…

Read More

जांबुळधाबा येथील सोलर प्रकल्पावर चोरी; ८० हजारांच्या कॉपर केबलवर चोरट्यांचा डल्ला

मलकापूर : तालुक्यातील जांबुळधाबा शिवारातील सोलर ऊर्जा प्रकल्पातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ८० हजार रुपये किमतीची कॉपर डीसी केबल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र बळीराम विचवे (रा. गजानन नगरी, मलकापूर) हे एलिव्हेट मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीमार्फत जांबुळधाबा…

Read More

बहापुरा येथे 21 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद

मलकापूर : तालुक्यातील बहापुरा येथे २१ वर्षीय तरुणीचा राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. २९) दुपारी उघडकीस आली. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजाता वामन इगळे (वय २१, रा. बहापुरा) या घरातील मागील खोलीत ओढणीच्या साहाय्याने लोखंडी…

Read More

फवारणीसाठी गेलेल्या युवकाचा पंपहाऊसच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू; नांदुरा तालुक्यातील घटना!

नांदुरा : तालुक्यातील जिगाव शिवारात फवारणीच्या कामादरम्यान २३ वर्षीय युवकाचा पंपहाऊसमधील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि. २५) घडली. या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. मृत युवकाचे नाव उमेश भानुदास तितरे (वय २३, रा. जिगाव) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश तितरे हे राहुल अनिल आडे यांच्यासोबत…

Read More

बेलाडमध्ये युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

मलकापूर : तालुक्यातील बेलाड गावात ३२ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना २३ जुलै रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून मलकापूर शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. मृत युवकाचे नाव राजेंद्र गजानन संबारे (वय ३२, रा. बेलाड, ता. मलकापूर) असे…

Read More

दसरखेडमधील विहिरीत २४ वर्षीय युवकाचा मृतदेह; मृत्यूचे कारण अस्पष्ट

मलकापूर : तालुक्यातील दसरखेड येथील एका शेतातील विहिरीत २४ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. राहुल मधुकर नरोटे (वय २४, रा. दसरखेड) असे मृत युवकाचे नाव असून, एमआयडीसी दसरखेड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल नरोटे हा खासगी कंपनीत कार्यरत होता. १८ जुलै रोजी दुपारी…

Read More
error: Content is protected !!