Headlines

दुधलगावातून ९० हजारांचे दोन बैल लंपास; मलकापूर ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल!

मलकापूर :- तालुक्यातील दुधलगाव बु. येथे अज्ञात चोरट्यांनी गोठ्यातून दोन बैल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या चोरीमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत असून मलकापूर ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दुधलगाव बु. येथील शेतकरी अभिषेक विष्णू नारखेडे (वय २५) यांच्या मालकीचे सुमारे ९० हजार रुपये किमतीचे…

Read More

वीजेच्या तडाख्यात शेतकऱ्याची बैलजोडी दगावली; ७० हजारांचे नुकसान, खामगांव तालुक्यातील घटना!

खामगाव:- मान्सूनच्या आगमनानंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली असताना खामगाव तालुक्यातील किन्ही महादेव येथे दुर्दैवी घटना घडली. शेतकरी संजय लक्ष्मण गव्हाणे यांच्या गोठ्यावर वीज कोसळल्याने त्यांची बैलजोडी जागीच दगावली असून या घटनेत सुमारे ६० ते ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात २२ व २३ जून रोजी ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह…

Read More

शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास; ५८ वर्षीय इसमाची आत्महत्या, मलकापूर तालुक्यातील घटना!

मलकापूर : तालुक्यातील वडोदा येथील ५८ वर्षीय इसमाने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना २३ जून रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वडोदा येथील रहिवासी अरुण रामचंद्र मुंढे (वय ५८) यांनी गावालगतच्या शिवारातील गट क्रमांक ४४९ मधील…

Read More

पळशीत घर-दुकान फोडून चोरी; ३३ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास

खामगाव : तालुक्यातील पळशी बु. येथे अज्ञात चोरट्यांनी घर व दुकानाचे कुलूप तोडून रोकडसह ३३ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली सदानंद धनोकार (वय ४१, रा. पळशी बु., ता. खामगाव) या कटलरी व कापड व्यवसाय…

Read More

पिंप्री कोळी शिवारात मध्यरात्री वाळू माफियांवर पोलिसांचा धडक कारवाईचा हातोडा; चार टिप्पर जप्त; तब्बल ५५ लाखांहून अधिक मुद्देमालासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

नांदुरा:- शासनाचा महसूल बुडवत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांवर नांदुरा पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई करत चार टिप्परांसह तब्बल ५५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ग्राम पिंप्री कोळी शिवारात करण्यात आली असून, या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोहेकॉं. विक्रमसिंह राजपुत यांना गुप्त माहिती मिळाली…

Read More

पाण्यात बुडून 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू; नांदुरा तालुक्यातील घटना!

नांदुरा:- गाईला हाकलण्यासाठी पूर्णा नदीच्या काठावर गेलेल्या 23 वर्षीय तरुणाचा पाय घसरून नदीच्या पाण्यात बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पातोंडा शिवारात घडली. या घटनेमुळे आलमपूर गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृत तरुण हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याने शोककळा पसरली आहे. नांदुरा तालुक्यातील आलमपूर येथील तुषार रामदास तायडे (वय 23) हा कोठारी महाविद्यालय, नांदुरा…

Read More

घरात घुसून महिलेचा विनयभंग; आरोपीविरुद्ध गुन्हा, मोताळा तालुक्यातील घटना!

बुलढाणा : मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात मध्यरात्री घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १५ मे रोजी रात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास ३० वर्षीय महिला आपल्या घरात झोपलेली होती….

Read More

चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीचे शोषण; तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा; मलकापूर तालुक्यातील घटना

मलकापूर : तालुक्यातील दाताळा परिसरात अल्पवयीन मुलीवर धमकावून वारंवार अत्याचार केल्याची गंभीर घटना समोर आली असून, पीडितेच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध पोक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दाताळा येथील १६ वर्षीय मुलगी शिक्षण घेत असून, घराच्या बांधकामाच्या कामादरम्यान तिची मुख्य…

Read More

दगडवाडीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; गावात शोककळा

देऊळगाव राजा : तालुक्यातील दगडवाडी येथे २५ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली. गुरुवारी सकाळी ही घटना समोर आल्यानंतर गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असून परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे. मृत तरुणाचे नाव विशाल अजाबराव जायभाये (वय २५, रा. दगडवाडी) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळच्या सुमारास विशाल…

Read More

बोराखेडी शिवारात गोठा फोडून शेळ्या-बोकडांची चोरी; पशुपालकांत भीती!

मोताळा :- तालुक्यातील बोराखेडी शिवारात अज्ञात चोरट्यांनी गोठ्याचे कुलूप तोडून शेळ्या-बोकडांची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात सुमारे ८० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भास्कर रामकृष्ण भिवटे हे शेळीपालन व्यवसाय करतात. त्यांच्या घराजवळील टिनशेड व लोखंडी जाळीच्या गोठ्यात सुमारे ३० शेळ्या व बोकड ठेवले होते. ३ मे…

Read More
error: Content is protected !!