बहापुरा येथे 21 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद

मलकापूर : तालुक्यातील बहापुरा येथे २१ वर्षीय तरुणीचा राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. २९) दुपारी उघडकीस आली. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजाता वामन इगळे (वय २१, रा. बहापुरा) या घरातील मागील खोलीत ओढणीच्या साहाय्याने लोखंडी पाइपला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने खाली उतरवून उपचारासाठी मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच मलकापूर शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. फिर्यादीच्या जबाबानुसार मृत्यूबाबत कोणावरही संशय व्यक्त करण्यात आलेला नसून, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!