Headlines

कायद्याच्या रक्षकाकडूनच विश्वासघात; लग्नाचे स्वप्न दाखवून तरुणीवर अत्याचार; एसआरपीएफ जवानाविरुद्ध गुन्हा दाखल; खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी

लोणार : समाजात महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर असते, त्याच वर्दीतील व्यक्तीकडून एका तरुणीचा विश्वासघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमाच्या नावाखाली जवळीक साधून लग्नाचे आमिष दाखवत एका २२ वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा आरोप राज्य राखीव पोलिस दलातील (SRPF) जवानावर करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे “कायद्याचे रक्षकच भक्षक होत आहेत का?” असा…

Read More

शेतातील सौरपंप साहित्याची चोरी; शेतकऱ्याचे हजारोंचे नुकसान

लोणार :- तालुक्यातील देऊळगाव वायसा येथे शेतातील सौरपंपाशी संबंधित साहित्य चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात शेतकऱ्याचे सुमारे २२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोंडीबा आश्रुबा सोनुने (वय ४४) यांच्या गट क्रमांक ३१३ मधील शेतात शासनाच्या अनुदानातून सौरपंप बसविण्यात आला होता. २ एप्रिल रोजी संध्याकाळी ते शेतातून घरी परतले होते. दरम्यान…

Read More

३३५ स्प्रिंकलर तोट्या, मोटरपंप व केबल लंपास; शेतकऱ्यांचे ९० हजारांचे नुकसान

  लोणार :- हिरडव, दाभा व जाफ्राबाद शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातून अज्ञात चोरट्यांनी ३३५ स्प्रिंकलरच्या तोट्या, मोटरपंप व केबल चोरी करून सुमारे ९० हजार ७५० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. माहितीनुसार, परिसरातील सुमारे १८ ते २० शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूग व मूग पिकासाठी ३ एप्रिल रोजी…

Read More

झोपेत विषारी सापाने दंश केल्याने 19 वर्षीय युवतीचा मृत्यू, लोणार तालुक्यातील घटना!

लोणार : तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ येथे झोपेत असताना विषारी सापाने दंश केल्याने १९ वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना ४ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव कुंडपाळ येथील रवींद्र शेषराव सानप यांची १९ वर्षीय मुलगी कु. साक्षी सानप ही शुक्रवारी रात्री आई-वडिलांसोबत घरात झोपलेली…

Read More

चिखला काकड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून दोन गटांत भीषण तणाव; महिला पदाधिकाऱ्यावर हल्ल्याचा आरोप, ३७ जणांवर गुन्हे तर २१ अटकेत

  लोणार :- तालुक्यातील चिखला काकड येथे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या उभारणीवरून दोन गटांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला असून गावातील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते. या प्रकरणी पोलिसांनी ३७ जणांविरुद्ध गुन्हे नोंदवून २१ जणांना अटक केली आहे. गावात काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींनी पुतळा उभारला होता. तो अन्य ठिकाणी हलवावा की नाही, या…

Read More

जमिनीच्या वाटणीवरून ३२ वर्षीय तरुणाचा खून; वडील-भावावर गुन्हा दाखल!

  लोणार ता. : – तालुक्यातील सावरगाव मुंढे येथे शेतीच्या वाटणीच्या वादातून ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वडील आणि भावाविरुद्ध लोणार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपी फरार आहेत. मृतक कृष्णा गणेश चव्हाण (वय ३२, रा. सावरगाव मुंढे) यांच्यात कुटुंबासोबत काही दिवसांपासून शेतीच्या हिस्स्यावरून वाद सुरू असल्याची…

Read More
error: Content is protected !!