शेतात औषध फवारणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू देऊळगावराजा येथील घटना
देऊळगावराजा : शेतात काम करताना क्षणभराच्या निष्काळजीपणाचीही मोठी किंमत मोजावी लागू शकते, याची जाणीव करून देणारी दुर्दैवी घटना देऊळगावराजा तालुक्यात घडली. जवळखेड शिवारात शेतात औषध फवारणी करण्यासाठी गेलेल्या ४५ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला. ही घटना १४ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. मधुकर कडुबा कायंदे (वय ४५, रा. उंबरखेड) हे जवळखेड शिवारातील शेतात औषध फवारणी…
