Headlines

मद्यप्राशन करून आलेल्या मुलाने शेतीच्या वादातून जन्मदात्याचे डोके फोडले ! खामगाव तालुक्यातील घटना

खामगावः पिता-पुत्रांतील शेतीचा वाद विकोपाला गेल्याने पुत्राने वडिलांचे डोके फोडले. ही घटना गुरुवारी रात्री खामगाव तालुक्यातील मांडका येथे घडली. तक्रारीनुसार, सुभाष श्रीराम सातव (६५) गुरुवारी रात्री घरी असताना, त्यांचा गणेश नामक मुलगा मद्य प्राशन करून घरी आला. शेतीच्या हिश्श्याची मागणी करून अश्लील शिवीगाळ करायला लागला. वाद नको, म्हणून सकाळी या विषयावर बोलू असले म्हटले असता, गणेशने वडिलांच्या कपाळावर दगड मारून जखमी केले. शेतीत हिस्सा न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप तक्रारीत केला. या प्रकरणी पोलिस तक्रार आणि वैद्यकीय अहवालावरून पिंपळगाव राजा पोलिसांनी संशयित पुत्राविरोधात भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गन्हा दाखल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!