Headlines

लग्नाचे स्वप्न दाखवून विधवा महिलेचे शोषण? १२ वर्षांच्या मुलाची जबाबदारी घेण्याचे आश्वासन देत अत्याचाराचा आरोप

शेगाव : पतीच्या निधनानंतर मुलासह आयुष्याचा नवा आधार शोधणाऱ्या एका विधवा महिलेच्या विश्वासाचा गैरफायदा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘तुझ्याशी लग्न करतो, तुझ्या मुलालाही सांभाळतो’ असे आश्वासन देत जवळीक साधली आणि त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप ३० वर्षीय महिलेने केला आहे. लग्नाबाबत विचारणा केली असता शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे २०१३ मध्ये लग्न झाले होते. मात्र, २०१५ मध्ये पतीचे निधन झाल्यानंतर त्या आपल्या १२ वर्षीय मुलासह राहत होत्या. याचदरम्यान गावातील निलेश बाळू तायडे याने त्यांच्याशी जवळीक साधली. महिलेच्या तब्येतीची तसेच मुलाची विचारपूस करून त्याने विश्वास संपादन केला. ‘तुझ्याशी लग्न करतो आणि मुलाला सांभाळतो,’ असे आश्वासन देत त्याने महिलेला लग्नाचे स्वप्न दाखविल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!