Headlines

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देत अपमानास्पद वर्तन केल्याचा आरोप; पालकांसह सामाजिक कार्यकर्त्यांची शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार

मलकापूर : विद्यार्थ्यांना भीती दाखवून मानसिक दबावात ठेवणे, अनुचित स्पर्श करणे तसेच वर्गात अपमानास्पद व दंडात्मक वर्तन केल्याचा गंभीर आरोप झेडए उर्दू ज्युनिअर कॉलेजमधील एका शिक्षकावर करण्यात आला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीती व मानसिक तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगत संबंधित शिक्षकावर चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. याबाबत ३ सप्टेंबर रोजी बुलढाणा शिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देण्यात आली.
पालक शेख अकील शेख जमील तसेच सामाजिक कार्यकर्ते इलाही बक्क्ष आणि शेख जलील कुरेशी यांनी दिलेल्या तक्रारीत झेडए उर्दू ज्युनिअर कॉलेज, मलकापूर येथील शिक्षक जावेद अख्तर अब्दुल जलील यांच्यावर विविध गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तक्रारीनुसार, शिक्षक विद्यार्थ्यांना वर्गात मानसिक त्रास देऊन भीती दाखवतात. तसेच परीक्षेत नापास करण्याची धमकी देत विद्यार्थ्यांवर दबाव निर्माण केला जात असल्याचा आरोप आहे. वर्गामध्ये विद्यार्थ्यांना अनुचित व अपमानास्पद शिक्षा करणे, सर्व विद्यार्थ्यांसमोर अपमानित करून माफी मागण्यास भाग पाडणे, अशा प्रकारचे वर्तन केले जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या वर्तनामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीती, मानसिक तणाव आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. तक्रार केवळ एका विद्यार्थ्यापुरती मर्यादित नसून अनेक विद्यार्थ्यांकडून अशाच स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित शिक्षकाची चौकशी करावी, विद्यार्थ्यांचे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!