जांबुळधाबा येथील सोलर प्रकल्पावर चोरी; ८० हजारांच्या कॉपर केबलवर चोरट्यांचा डल्ला

मलकापूर : तालुक्यातील जांबुळधाबा शिवारातील सोलर ऊर्जा प्रकल्पातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ८० हजार रुपये किमतीची कॉपर डीसी केबल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र बळीराम विचवे (रा. गजानन नगरी, मलकापूर) हे एलिव्हेट मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीमार्फत जांबुळधाबा शिवारातील सुराणा इलेक्ट्रिक प्रा. लि.च्या सोलर प्रकल्पावर सुरक्षा सेवा पुरवतात. २६ जुलै रोजी पहाटे ४ ते ५ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी प्रकल्पातील प्रत्येकी सुमारे १,२५० मीटर लांबीचे कॉपर डीसी केबलचे दोन बंडल, म्हणजेच एकूण २,५०० मीटर केबल चोरी करून नेली. चोरीस गेलेल्या मालाची अंदाजे किंमत ८० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सविता मोरे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!