Headlines

शाळेत जात असलेल्या शिक्षिकेला अडवून, ‘तुम्ही मला खूप आवडता, मला तुमच्याशी बोलायचे आहे,’ असे म्हणत मोबाईल क्रमांकची मागणी; तरुणावर गुन्हा

चिखली : शाळेत जाणाऱ्या ३८ वर्षीय शिक्षिकेचा पाठलाग करून तिच्याशी बोलण्याचा आग्रह धरत मोबाईल क्रमांक मागितल्याचा प्रकार चिखली शहरात समोर आला आहे. या घटनेमुळे घाबरलेल्या शिक्षिकेने चिखली शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सुमारे ८.४५ ते ८.५० वाजताच्या दरम्यान एका शाळेच्या परिसरात ही घटना घडली. शिक्षक कॉलनी परिसरात राहणाऱ्या संबंधित शिक्षिका शाळेकडे जात असताना अकील अहमद अब्दुल अहमद (रा. चिखली) याने त्यांचा पाठलाग केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
आरोपीने शिक्षिकेला अडवून, ‘तुम्ही मला खूप आवडता, मला तुमच्याशी बोलायचे आहे,’ असे म्हणत मोबाईल क्रमांक देण्याची मागणी केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या शिक्षिकेने पोलिसांत तक्रार दिली.
या तक्रारीच्या आधारे चिखली शहर पोलिसांनी अप क्रमांक ६४३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ७८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास चतरकर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!