Headlines

महाकालेश्वर संस्थानच्या पाणीपुरवठा योजनेवर चोरट्यांचा डल्ला; विहिरीतील मोटार लंपास

जळगाव जामोद : तालुक्यातील जामोद येथील श्री महाकालेश्वर संस्थानच्या पाणीपुरवठा योजनेतील विहिरीत बसविण्यात आलेली मोटार अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री महाकालेश्वर संस्थानने सन २०२३ मध्ये भाविकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी विहिरीत मोटार बसविली होती. शुक्रवारी (दि. २४ जुलै) सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास मोटार जागेवर नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला.
या घटनेप्रकरणी संस्थानचे अध्यक्ष दीपक गजानन वानखेडे यांनी जळगाव जामोद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवून चोरीस गेलेल्या मोटारीचा तसेच आरोपीचा शोध सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!