मलकापूर : तालुक्यातील दुधलगाव बुद्रुक येथे अज्ञात चोरट्यांनी गुरांच्या वाड्यातून सुमारे ९० हजार रुपये किमतीचे दोन बैल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुधलगाव बुद्रुक येथील अभिषेक विष्णू नारखेडे यांच्या गुरांच्या वाड्यात १८ जुलै रोजी रात्री १० ते १९ जुलै रोजी सकाळी ५.३० वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून अंदाजे ९० हजार रुपये किमतीचे दोन बैल चोरून नेले. सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अप. क्र. १५१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०३(२) अंतर्गत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.