मलकापूर बसस्थानकासमोर तिघांना बेदम मारहाण; बच्चों की बँक प्रकरणातून घटना घडल्याची चर्चा!

मलकापूर :- येथील बसस्थानकसमोर आज शुक्रवार (दि. २४) दुपारी सुमारे साडेतीन वाजण्याच्या सुमारास तीन जणांना मारहाण झाल्याची घटना घडली. या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित तीन व्यक्ती दिल्लीहून मलकापूर येथे आल्या होत्या. काही आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला आणि त्याचे रूपांतर मारहाणीत झाले. या दरम्यान एका व्यक्तीला काही जणांनी पकडून ठेवले होते; मात्र नंतर इतरांनी हस्तक्षेप करत त्याची सुटका केली. घटनेदरम्यान बसस्थानक परिसरात मोठी गर्दी जमली होती. या प्रकरणाचा संबंध तथाकथित “बच्चों की बँक” प्रकरणाशी असल्याची चर्चा परिसरात रंगली; मात्र याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील नेमके कारण व तपशील पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!