विवाहितेचा छळप्रकरणी सासरच्या सात जणांवर मलकापूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल!

मलकापूर :- तालुक्यात विवाहित महिलेचा चारित्र्यावर संशय घेत शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती भगवान कुवारे (वय २८, मूळ रा. चिखलगाव, ता. जि. अकोला, सध्या रा. अनुराबाद, ता. मलकापूर) यांचा विवाह १५ फेब्रुवारी २०२१ रोजी भगवान रघुनाथ कुवारे यांच्याशी झाला होता. विवाहानंतर सासरच्या मंडळींकडून चारित्र्यावर संशय घेत वारंवार मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या छळाला कंटाळून त्या गेल्या वर्षभरापासून माहेरी राहत होत्या. अखेर त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भगवान रघुनाथ कुवारे, रघुनाथ विश्वनाथ कुवारे, शोभाबाई रघुनाथ कुवारे, दुर्गेश, परशुराम, महादेव रघुनाथ कुवारे आणि शारदा विलास चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस अंमलदार रामचंद्र भोपळे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!