मेहुणाराजा येथे दुकानात घुसून महिलेला मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा!

देऊळगाव राजा : – तालुक्यातील मेहुणाराजा येथे दुकानात घुसून एका महिलेला धक्काबुक्की व मारहाण केल्याची घटना 8 मार्च रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रिती बाबासाहेब नांदवे (वय 28, रा. दगडवाडी, ता. देऊळगाव राजा) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार उद्धव उत्तम सुरडकर (वय 34 ), धोडिंबा सिताराम बनसोडे (वय 38 ), अमोल मुर्कीदा बनसोडे (वय 25 ) आणि संतोष सुरडकर (वय 25, सर्व रा. सुरा) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादी महिलेच्या म्हणण्यानुसार, त्या आपल्या दुकानात असताना आरोपी तेथे आले आणि त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी शिवीगाळ करू नका असे सांगितल्यावर आरोपी संतापले आणि त्यांनी वाद घालत धक्काबुक्की करत मारहाण केली. या प्रकारानंतर आरोपींनी चारचाकी वाहनाने तेथून पळ काढल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!