Headlines

सरपंचावर प्राणघातक हल्ला, एक आरोपी ताब्यात; खामगाव तालुक्यातील सुटाळा येथील घटना!

खामगाव :- तालुक्यातील सुटाळा फाटा येथे ग्रामपंचायत सरपंच निलेश देशमुख यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान या हल्ल्यात झाले. हल्लेखोरांनी लोखंडी रॉडने देशमुख यांच्या डोक्यावर गंभीर वार केले, मात्र ते थोडक्यात बचावले. घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी मयूर सिद्धपुरा याला अटक केली असून अन्य आरोपी फरार झाले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!