खामगाव :- अकोला मार्गावरील शासकीय धान्य गोदामाजवळ भीषण अपघात झाला. प्रवासी बसविण्यासाठी रस्त्यावर उभ्या असलेल्या लक्झरीला (क्र. एमपी ०९ पीए ०८४९) भरधाव वेगात आलेल्या ट्रकने (क्र. एडी-३९ व्हीए ७८७८) ला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात लक्झरी पलटी होऊन चालकासह ६ प्रवासी गंभीररित्या जखमी झाले. रापीका पवन पाटीदार (३५) सुलोचना किसनरावजी ठाकरे (५०) अशोक नंदलाल आखर (५४)
जितेंद्र सज्जनसिंह सिसोदीया (३६) प्रमोद श्रीनंदु आमटे (४०)
6 ) लक्झरी चालक ( नाव कळू शकले नाही )सर्व जखमींना तातडीने खामगावच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मध्यप्रदेशवरून अकोल्याकडे जाणारी लक्झरी प्रवासी बसवण्यासाठी थांबवण्यात आली होती, त्याचवेळी मागून ट्रकने धडक दिली. पोलीस अधिक तपास करत आहेत.