खामगाव : मित्रासोबत वाद का केला असे म्हणून युवकाने इसमास चाकुने पाठीवर मारुन जखमी केल्याची घटना शहरालगत वाडी येथील इंदिरा नगरात घडली.
याबाबत संतोष शालीग्राम दामोदर वय ४५ रा. इंदिरा नगर वाडी यांनी शहर पोस्टेला तक्रार दिली की, १६ऑक्टोंबर रोजी ते गावात ग्रंथ समाप्तीच्या कार्यक्रमामध्ये गेले होते. यावेळी गावातीलच अभिजीत गवई वय ३० हा तेथे आला व माझ्या मित्रांसोबत तू वाद का केला असे म्हणून त्याने चाकुने पाठीवर मारुन जखमी केले. तसेच शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरुन पोलिसांनी अभिजीत गवई याच्याविरुध्द कलम ११८(१), ३५२ (३) भारतीय न्यय संहितानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.