५०० रुपयांच्या वादातून तरुणावर हल्ला; काचेच्या शिशीने डोळ्याजवळ दुखापत
देऊळगाव राजा : अवघ्या ५०० रुपयांच्या सायकल व्यवहारातून सुरू झालेल्या किरकोळ वादाचे रूप हिंसक हाणामारीत झाल्याची धक्कादायक घटना सावखेड भोई व भिवगाव परिसरात घडली. काकांना मारहाण होत असल्याचे पाहून मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणालाच आरोपींनी गाडीत बसवून भिवगाव येथे नेले आणि सामूहिक मारहाण केल्याचा आरोप आहे. यावेळी काचेच्या शिशीने डाव्या डोळ्याजवळ वार करून दुखापत केल्याची तक्रार…
