चिखलीत सराईत गुन्हेगार पिस्तुलासह जेरबंद
चिखली : शहरात रात्रीच्या वेळी गस्त घालत असलेल्या चिखली पोलिसांच्या डी. बी. पथकाने एका सराईत गुन्हेगाराला देशी बनावटीच्या पिस्तुलासह रंगेहात पकडल्याने खळबळ उडाली आहे. संभाजी नगर परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४५ हजार रुपये किमतीचे पिस्तूल जप्त केले असून, आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २३ ऑगस्टच्या रात्री चिखली पोलीस…
