बुलडाणा जिल्ह्यात चोरट्यांसह गुन्हेगारी वाढली; ग्रामीण भागात दहशत, “आपलं गाव आपली जबाबदारी”तून तरुणांचा रात्री पाहारा
मलकापूर :- बुलडाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोरी, दरोड्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून नागरिक हैराण झाले आहेत. रोजच कुठे ना कुठे चोरी उघडकीस येत आहे. नांदुरा तालुक्यातील काटी येथे दरोड्यात एका व्यक्तीचा खून आणि माकनेर येथे महिलेवर हल्ला, खामगाव-बुट्टी येथे चोरट्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्याच्या घटना घडल्या आहेत. मलकापूरमध्ये चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत….
