Headlines

डीपीची तार कापून चोरीचा प्रयत्न; छोटा हत्तीसह ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

मलकापूर : राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या महावितरणच्या डीपीवरील तार कटरच्या सहाय्याने कापून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पकडण्यात आले आहे. या कारवाईत पोलिसांनी छोटा हत्ती वाहन, अॅल्युमिनियमची तार व तार कटर असा तब्बल ५ लाख ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोघांसह दोन अज्ञात आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणथम…

Read More

गांजाच्या अवैध विक्रीचा पर्दाफाश; ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त, १९ वर्षीय तरुण ताब्यात, मोताळ्यात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

मोताळा : शहरातील पाचपीर दर्गा परिसरात सुरू असलेल्या गांजाच्या बेकायदेशीर विक्रीचा बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. ६ सप्टेंबरच्या रात्री करण्यात आलेल्या धडक कारवाईत १ किलो १७० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी १९ वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. जप्त मुद्देमालाची किंमत ५८ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. मोताळा शहरातील पाचपीर…

Read More

शौचालयाच्या खिडकीतून उडी मारून फरार; सराईत आरोपी ६ तासांत भुसावळहून जेरबंद

बुलढाणाः जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणलेल्या आरोपीने पहाटेच्या सुमारास शौचालयाच्या खिडकीतून उडी मारून पोलीस कोठडीतून पलायन केल्याची खळबळजनक घटना घडली. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या सहा तासांत फरार आरोपीचा माग काढत त्याला जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथून जेरबंद केले. आरोपीला पळून जाण्यास मदत करणाऱ्या त्याच्या भावालाही पोलिसांनी ताब्यात घेतले…

Read More

राहत्या घरी गळफास; २७ वर्षीय महिलेची आत्महत्या; शेगांव येथील घटना

शेगाव : शहरातील व्यंकटेश नगर परिसरात एका २७ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना ५ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेगाव शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. कीर्ती राजेश गोंड (२७, रा. व्यंकटेश नगर, शेगाव) असे मृत महिलेचे नाव आहे….

Read More

विद्यार्थ्यांना एसटी बसेस च्या पासेस काढण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी लावण्याची शिवसेना (उबाठा)ची मागणी

मलकापूर:- मलकापूर बस स्थानकात विद्यार्थ्यांच्या बसेसच्या पास काढण्यासाठी दोनच कर्मचारी असून विद्यार्थ्यांच्या मोठ्या रांगाच्या रांगा पासेस काढण्यासाठी आठ दिवसांपासून लागत आहे. आज सकाळी नऊ वाजे दरम्यान एका विद्यार्थ्याला चक्कर येऊन पडल्याने याबाबतची माहिती संबंधित पालकांनी शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांना दिल्याने त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह आगार व्यवस्थापक देशमाने यांची भेट घेऊन कर्मचारी वाढविण्याची मागणी केली…

Read More

“तू दिसायला चांगली नाहीस” असे म्हणत ५० हजारांसाठी नवविवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या ७ जणांवर गुन्हा

मोताळा : सुखी संसाराची स्वप्ने उराशी बाळगून सासरच्या उंबऱ्यात पाऊल ठेवलेल्या १८ वर्षीय नवविवाहितेच्या वाट्याला मात्र छळ आणि अपमान आला. तू दिसायला चांगली नाहीस, असे हिणवत माहेरहून ५० हजार रुपये आणण्याची मागणी करीत शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी पतीसह सासरकडील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मोताळा येथील सुलतानाबी शेख अजीम या विवाहितेचा…

Read More

पाणी पिण्यासाठी उतरला, चोरट्याने बॅगच पळविली; मलकापूर बस स्थानकातील घटना

मलकापूर : बसस्थानक परिसरात क्षणभराच्या निष्काळजीपणाचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने वैद्यकीय प्रतिनिधीची महत्त्वाची कागदपत्रे, बँक कार्डे आणि सुमारे २५ हजार रुपये किमतीचा टॅब असलेली बॅग लंपास केल्याची घटना ३ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अकोट येथील अभिजित प्रमोद जवरकर (३४) हे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून, ते…

Read More

राष्ट्रीय धोबी महासंघाच्या बुलढाणा जिल्हाप्रमुखपदी भिकू भातुरकर यांची नियुक्ती; वाढदिवसानिमित्त अनाथ आश्रमात भोजनदान

मलकापूर : राष्ट्रीय धोबी महासंघाच्या वतीने मलकापूर येथील भिकू सुपडाजी भातूरकर यांची बुलढाणा जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. १ सप्टेंबर २०२६ रोजी त्यांना नियुक्तीपत्र देत ही जबाबदारी सोपविण्यात आली. समाजाच्या विकासासाठी तसेच समाजबांधवांच्या प्रश्नांसाठी काम करण्याची संधी मिळाल्याने भातूरकर यांनी या नियुक्तीबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांच्या नियुक्तीचे समाजबांधवांकडून स्वागत होत आहे. दरम्यान, ६ सप्टेंबर रोजी…

Read More

संत ज्ञानेश्वर नगरात रात्रीच्या अंधारात तोंडाला रुमाल बांधून लपून बसलेले चौघे ताब्यात

मलकापूर : शहर परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मलकापूर शहर पोलिसांनी रात्रीची गस्त आणि पेट्रोलिंग अधिक प्रभावी केले आहे. याचदरम्यान संत ज्ञानेश्वर नगर परिसरात मध्यरात्री संशयास्पदरीत्या अंधारात लपून बसलेल्या चार इसमांना पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. दिनांक ६ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी रात्रीची…

Read More

सैनिक कधीही सेवानिवृत्त होत नाही कोणत्या ना कोणत्या माध्यमातून देशाची सेवा करीतच असतात- आ.चैनसुख संचेती

मलकापूर : राम विश्वासराव तायडे यांचे सारखे हजारो सैनिक देशाचे दिवस-रात्र सेवा करतात. म्हणूनच तुम्ही आपण शांततेत झोपू शकतो. सैनिकच देशाची खरी ताकद असून सैनिक कधीही सेवानिवृत्त होत नाही तर ते आजीवन कोणत्या ना कोणत्या माध्यमातून देशाची सेवा करतच असतात, असे प्रतिपादन आ.चैनसुख संचेती यांनी वरखेडचे सुपुत्र राम विश्वासराव तायडे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सेवा…

Read More
error: Content is protected !!