एसबीआय बँकेसमोर दिवसाढवळ्या हातसफाई; स्कुटीची डिक्की फोडून ३५ हजारांवर डल्ला
शेगाव : शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात पुन्हा एकदा चोरट्यांनी धाडसी हातसफाई करत एसबीआय बँकेसमोर उभी असलेल्या स्कुटीची डिक्की फोडून ३५ हजार रुपये लंपास केले. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे बँक परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. फरशी जामा मशिदीजवळ राहणारे मोहम्मद शरीफ मोहम्मद याकूब (वय ४७) हे प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या पार्टनर मोहम्मद इरफान मोहम्मद…
