मलकापुर:- महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल व गॅसची भीषण टंचाई असून 45 डिग्रीच्या भर उन्हाळ्यात नागरिकांना, शेतकऱ्यांना, ट्रॅक्टर धारकांना पेट्रोल आणि डिझेल साठी उन्हातान्हात लाईन मध्ये उभे राहावे लागत आहे,तर दुसरीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेशात फिरून “मेलोडी चॉकलेट “वाटप करीत आहे.मोदी सरकारचा निषेध म्हणून शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांच्या नेतृत्वात पेट्रोलपंप मेलोडी चॉकलेट वाटप करण्यात आले.
मलकापूर शहरात एकूण सहा पेट्रोल पंप असून यातील पाच पेट्रोल पंप आज बंद असल्याने नांदुरा रोडवरील नायरा पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी पेट्रोल व डिझेल साठी एकच गर्दी केली होती.लोकांना पेट्रोल , डिझेल, गॅस साठी उन्हातान्हात उभं करून विदेशात फिरणाऱ्या मोदी सरकारचा जाहीर निषेध करीत शिवसेना (उबाठा)च्या पदाधिकाऱ्यांनी नायरा पेट्रोल पंपावर जाऊन उपस्थित वाहनधारकांना “मेलोडी चॉकलेट” वाटप करून मोदी सरकारचा जाहीर निषेध केला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, शिवसेना शहर प्रमुख हरीदास गणबास, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, शिवसेना उपशहर प्रमुख बाळू पोलाखरे, नगरसेवक रफिकभाई बर्तन वाले, माजी उपनगराध्यक्ष महादेव वनारे,नितीन गोसावी,वाहतूक सेना शहर प्रमुख इम्रान लकी, शाखाप्रमुख हसन गौरी, अनंता तायडे, संतोष राजपूत,शरद खराटे आदिंची उपस्थिती होती.