गोठ्याचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न; एकाला पकडले, दोघे पसार
खामगाव : शेतातील काम आटोपून जनावरांना चारा-पाणी करण्यासाठी गेलेल्या कुटुंबाला गोठ्याचे कुलूप फोडून चोरीचा प्रयत्न सुरू असल्याचे निदर्शनास आले. यावेळी तिघे जण गोठ्यात घुसण्याचा प्रयत्न करत होते. आरडाओरड होताच एक संशयित पकडला गेला, तर त्याचे दोन साथीदार अंधाराचा फायदा घेत पसार झाले. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वैभव एकनाथ वडोदे…
