Headlines

पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ‘आंतरराष्ट्रीय युवा दिन’ उत्साहात साजरा

मलकापूर: पद्म. डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मलकापूर येथे १२ ऑगस्ट २०२६ रोजी ‘आंतरराष्ट्रीय युवा दिना’चे औचित्य साधून विशेष मार्गदर्शक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाद्वारे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्र उभारणीत तरुणांची भूमिका: आव्हाने आणि संधी या विषयावर विशेष व्याख्यान पार पडले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून माजी प्राचार्य तथा ज्येष्ठ लेखक श्री. प्रमोद श्रीधर डोरले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन श्री. प्रमोद डोरले यांचा भावूक व सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात बोलताना श्री. प्रमोद डोरले यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा दाखला देत, “युवाशक्ती हीच राष्ट्राची खरी ताकद आहे,” असे प्रतिपादन केले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या थोर क्रांतिकारकांच्या त्यागाचे स्मरण करून देत त्यांनी आपल्या समृद्ध इतिहासातील युवाशक्तीच्या अद्वितीय योगदानावर प्रकाश टाकला. तसेच आजच्या जागतिक स्तरावर भारतीय तरुण आपल्या कर्तृत्वाने आणि कौशल्याने विविध क्षेत्रांत देशाचे नाव कसे उज्ज्वल करत आहेत, यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तरुणांसमोर असणारी आव्हाने पेलून उपलब्ध संधींचा राष्ट्राच्या प्रगतीसाठी कसा वापर करावा, याबद्दल त्यांनी उपस्थितांना प्रेरित केले.

हा कार्यक्रम हा उपक्रम महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. ज्ञानदेव पाटील, उपाध्यक्ष श्री. प्रदिप कोलते, सचिव डॉ. अरविंद कोलते आणि खजिनदार श्री. सुधीर पाचपांडे यांच्या प्रेरणेने तसेच प्राचार्य डॉ. अनिल खर्चे आणि उपप्राचार्य डॉ. युगेश खर्चे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रा. निलेश बुडुखले यांनी केले, तर उपस्थितांचे मनःपूर्वक आभार प्रा. सदाशिव लवंगे यांनी मानले. या प्रसंगी आयक्यूएसी विभागाचे अधिकारी प्रा. रमाकांत चौधरी, इलेक्ट्रिकल विभागप्रमुख प्रा. योगेश सुशिर, प्रा. अमोल हळदे, प्रा. निलेश बुंधे, प्रा. योगेश जाधव, प्रा. शिवानी खेडकर, प्रयोगशाळा सहाय्यक राहिल खान, मंगेश पाटील, तसेच ‘दिव्य मराठी’चे प्रतिनिधी धीरज वैष्णव यांच्यासह विविध विभागांचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!