मलकापूर:- रावेर लोकसभा संपर्कप्रमुख पदी गुलाबराव पाटील (वाघ) यांची निवड झाल्याने दि.10सप्टेबर रोजी धरणगाव (जळगाव खां)येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन मलकापूर विधानसभा सहसंपर्कप्रमुख वसंतराव भोजने, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांनी त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
मलकापूर विधानसभा मतदारसंघ हा रावेर लोकसभेत येत असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या निर्देशानुसार रावेर लोकसभा संपर्कप्रमुख पदी गुलाबराव पाटील यांची नियुक्ती झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.