Headlines

विष प्राशन करून ४१ वर्षीय इसमाची आत्महत्या; वडजी येथील घटना

मलकापूर : तालुक्यातील वडजी येथे विषारी पदार्थ प्राशन करून ४१ वर्षीय इसमाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना ३ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. सुनील शरदचंद्र बोंडे (वय ४१) असे मृत व्यक्तीचे नाव असून, या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सुनील बोंडे यांच्या घराजवळ गर्दी दिसल्याने त्यांचे मित्र गजानन दामोधर अंभोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी सुनील बोंडे हे घराच्या दरवाजात पालथे पडलेल्या अवस्थेत आढळून आले. पाहणी केली असता त्यांनी विषारी पदार्थ प्राशन केल्याचे निदर्शनास आले.
घटनेची माहिती मिळताच मलकापूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आवश्यक कार्यवाही केली. सुनील बोंडे यांनी आत्महत्या कोणत्या कारणातून केली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!