साखरखेर्डा बसस्थानक बनले हाणामारीचे केंद्र; दोन गटांत तुफान राडा, काठी अन् लोखंडी रॉडने हल्ला; चौघे गंभीर जखमी, पोलिस ठाण्यातही पुन्हा वाद
साखरखेर्डा : बसस्थानक परिसरात दोन गटांतील वादातून हाणामारीच्या घटना सातत्याने घडत असून, शुक्रवारी (२ ऑक्टोबर) सकाळी पुन्हा दोन गटांत तुफान राडा झाला. काठी आणि लोखंडी रॉडने एकमेकांवर हल्ला चढविल्याने चार जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना बुलढाणा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, बसस्थानकावरील हाणामारीनंतर तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात पोहोचलेल्या दोन्ही…
