Headlines

गळफास घेऊन ४० वर्षीय युवकाची आत्महत्या; निमगावात शोककळा

नांदुरा : तालुक्यातील निमगाव येथील एका ४० वर्षीय युवकाने प्लॉटिंग परिसरातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. किसना सुखदेव ईवरकार (४०, रा. निमगाव) असे मृत युवकाचे नाव असून, या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, किसना ईवरकार यांचा मुलगा युवराज याने पहाटेच्या सुमारास काका…

Read More

खुमगाव बुट्टीत घरफोडीचा डाव फसला; चाकूचा धाक दाखविणारे दोघे नातेवाईकांच्या हाती

नांदुरा : घरात कोणी नसल्याची संधी साधून घरफोडी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना महिलेने हटकताच एकाने चाकूचा धाक दाखवून तिला धक्का दिला. त्यानंतर मोटारसायकलवरून पसार होणाऱ्या दोघांचा नातेवाईकांनी पाठलाग करून त्यांना पकडले. खुमगाव बुट्टी येथे शनिवार, २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडलेल्या या थरारक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. खुमगाव बुट्टी येथील सुलोचना संजय सातव…

Read More

२४ तासांत अल्पवयीन मुलीचा शोध; खंडवा येथून सुखरूप आणले; नांदुरा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

नांदुरा : शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडलेली अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, नांदुरा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपासाची चक्रे वेगाने फिरवित अवघ्या २४ तासांत मध्यप्रदेशातील खंडवा येथून मुलीचा सुखरूप शोध घेतला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या या कौशल्यपूर्ण तपासामुळे मुलीला सुरक्षितपणे तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात…

Read More

फवारणीसाठी गेलेल्या युवकाचा पंपहाऊसच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू; नांदुरा तालुक्यातील घटना!

नांदुरा : तालुक्यातील जिगाव शिवारात फवारणीच्या कामादरम्यान २३ वर्षीय युवकाचा पंपहाऊसमधील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि. २५) घडली. या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. मृत युवकाचे नाव उमेश भानुदास तितरे (वय २३, रा. जिगाव) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश तितरे हे राहुल अनिल आडे यांच्यासोबत…

Read More

शेअर मार्केटच्या आमिषाला शिक्षक बळी; १०.२५ लाखांची ऑनलाइन फसवणूक

नांदुरा : शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत नांदुरा येथील एका शिक्षकाची तब्बल १० लाख २५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बुलढाणा सायबर पोलिसांकडे दाखल झालेला झिरो एफआयआर नांदुरा पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून, अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदुरा येथील शिक्षक अब्दुल…

Read More

शेतात जाण्याच्या वादातून शेतकऱ्याला मारहाण; चौघांविरोधात गुन्हा

नांदुरा : शेतात ये-जा करण्याच्या मार्गाच्या वादातून एका शेतकऱ्याला शिवीगाळ, धक्काबुक्की व मारहाण करून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर सारंगधर बोंबटकर (वय ५५, रा. पिंपळगाव राजा, ता. खामगाव) यांची गट क्रमांक…

Read More

लोखंडी रॉडने हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा, नांदुरा तालुक्यातील घटना!

नांदुरा : तालुक्यातील नायगाव येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. एका व्यक्तीच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून जखमी केल्याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, १८ जून रोजी रात्री नायगाव येथे फिर्यादी संतोष प्रल्हाद सपकाळ (वय ३२) यांच्याशी आरोपींनी वाद घातला. यावेळी महेंद्र देविदास सपकाळ याने दारूच्या नशेत लोखंडी…

Read More

पिंप्री कोळी शिवारात मध्यरात्री वाळू माफियांवर पोलिसांचा धडक कारवाईचा हातोडा; चार टिप्पर जप्त; तब्बल ५५ लाखांहून अधिक मुद्देमालासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

नांदुरा:- शासनाचा महसूल बुडवत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांवर नांदुरा पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई करत चार टिप्परांसह तब्बल ५५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ग्राम पिंप्री कोळी शिवारात करण्यात आली असून, या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोहेकॉं. विक्रमसिंह राजपुत यांना गुप्त माहिती मिळाली…

Read More

पाण्यात बुडून 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू; नांदुरा तालुक्यातील घटना!

नांदुरा:- गाईला हाकलण्यासाठी पूर्णा नदीच्या काठावर गेलेल्या 23 वर्षीय तरुणाचा पाय घसरून नदीच्या पाण्यात बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पातोंडा शिवारात घडली. या घटनेमुळे आलमपूर गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृत तरुण हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याने शोककळा पसरली आहे. नांदुरा तालुक्यातील आलमपूर येथील तुषार रामदास तायडे (वय 23) हा कोठारी महाविद्यालय, नांदुरा…

Read More

जुन्या वादातून थार अंगावर घालून पाच जणांना चिरडण्याचा प्रयत्न कोकलवाडीत भरदिवसा थरार; गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल

मलकापूर / नांदुरा:- शेतीच्या जुन्या वादाचे रूप मंगळवारी थेट जीवघेण्या हल्ल्यात बदलल्याची धक्कादायक घटना कोकलवाडी येथे घडली. महिंद्रा थार गाडी भरधाव वेगाने अंगावर घालून पाच जणांना चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेत पाच जण जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रसिंह…

Read More
error: Content is protected !!