Headlines

झोडगा येथील अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी रिपब्लिकन सेनेचे तहसीलदारांना निवेदन; मूलभूत सुविधांचीही मागणी

मलकापूर : ३१ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे झोडगा गावातील शेतकरी तसेच नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्तांच्या नुकसानीचे स्पॉट पंचनामे करण्यात आले असतानाही अद्याप मदत मिळाली नसल्याने तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, तसेच गावातील मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी १५ सप्टेंबर २०२६ रोजी रिपब्लिकन सेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. रिपब्लिकन सेनेचे…

Read More

गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी घिर्णीत पोलिसांचे मार्गदर्शन; आठवडाभरात CCTV बसविण्याचा निर्णय

मलकापूर : – आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी घिर्णी येथे पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. पोलीस निरीक्षक गिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत गणेश मंडळे, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांना विविध सूचना देण्यात आल्या. गणेशोत्सव हा शांतता, एकोपा आणि सामाजिक बंधुभावाचा सण असून, उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी…

Read More

विष प्राशन करून ४१ वर्षीय इसमाची आत्महत्या; वडजी येथील घटना

मलकापूर : तालुक्यातील वडजी येथे विषारी पदार्थ प्राशन करून ४१ वर्षीय इसमाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना ३ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. सुनील शरदचंद्र बोंडे (वय ४१) असे मृत व्यक्तीचे नाव असून, या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते ३ वाजण्याच्या सुमारास ही…

Read More

बुलडाणा जिल्ह्यात चोरट्यांसह गुन्हेगारी वाढली; ग्रामीण भागात दहशत, “आपलं गाव आपली जबाबदारी”तून तरुणांचा रात्री पाहारा

मलकापूर :- बुलडाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोरी, दरोड्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून नागरिक हैराण झाले आहेत. रोजच कुठे ना कुठे चोरी उघडकीस येत आहे. नांदुरा तालुक्यातील काटी येथे दरोड्यात एका व्यक्तीचा खून आणि माकनेर येथे महिलेवर हल्ला, खामगाव-बुट्टी येथे चोरट्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्याच्या घटना घडल्या आहेत. मलकापूरमध्ये चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत….

Read More

टाकळी तलाव परिसरात रात्रीचा वीजपुरवठा खंडित; शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिक त्रस्त

खामगाव : तालुक्यातील टाकळी तलाव परिसरातील शेतकऱ्यांना गेल्या १५ ते २० दिवसांपासून रात्रीच्या सिंगल फेज वीजपुरवठ्याच्या खंडिततेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतात वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून, विद्यार्थ्यांच्या अभ्यासातही अडथळे निर्माण होत आहेत. टाकळी तलाव परिसरात अनेक शेतकरी आपल्या कुटुंबासह शेतात राहतात. मात्र रात्रीच्या वेळी वीज नसल्याने संपूर्ण परिसर अंधारात जात…

Read More

दुधलगावातील सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोघे जेरबंद; चार दिवसांची पोलीस कोठडी

मलकापूर : शेतात राहणाऱ्या १९ वर्षीय महिलेवर कोयता-विळ्याचा धाक दाखवत सामूहिक अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणाचा तपास करत मलकापूर ग्रामीण पोलिसांनी अखेर दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. तब्बल महिनाभरानंतर पोलिसांच्या हाती लागलेल्या या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २९ ऑगस्टपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुधलगाव बु. येथील लोणवडी…

Read More

फळझाड वाटपातून जलसंवर्धन दिन साजरा वाघुड येथे १५० शेतकऱ्यांना मोफत फळझाडांचे वाटप

वाघुड : जलसंवर्धन दिनाचे औचित्य साधून वाघुड येथे १५० लाभार्थी शेतकऱ्यांना मोफत फळझाडांचे वाटप करण्यात आले. एवोनिथ स्टील पुरस्कृत दिलासा संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘तरंग’ प्रकल्पांतर्गत मलकापूर तालुक्यातील १० गावांतील फळबाग लागवडीस इच्छुक शेतकऱ्यांना फळझाडांचा लाभ देण्यात आला. अनुराबाद, वाघुड, पान्हेरा, बहापुरा, हारसोडा, धोंगर्डी, घीर्णी, तांदुळवाडी, बेलाड आणि माकनेर या गावांतील निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना…

Read More

हरणखेड येथील शेतकऱ्यांच्या चार एकर शेतातील वांग्याचे पिक ग्रोथ प्रमोटर फवारल्याने जळून खाक;हजारो रुपयांचे नुकसान

मलकापुर:-: तालुक्यातील हरणखेड येथील सुरेश रमेश चोपडे यांच्या गट नंबर 106 शिवारातील चार एकरातील भरीत वांग्याच्या पिकावर श्रीकर कंपनीचे प्राईम प्रावर हे ग्रोथ प्रमोटर औषधाची दि.18 ऑगस्ट 26 रोजी फवारणी केली थोड्याच वेळात वांग्याची झाडे – झाडांची पाने वाळू लागले आणि वांग्याची झाडे पूर्ण करपली त्यामुळे संबंधित शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून याबाबतची तक्रार…

Read More

लोणवडीतील १८ वर्षीय युवती बेपत्ता; मलकापूर ग्रामीण पोलिसांत मिसिंगची नोंद

मलकापूर : तालुक्यातील लोणवडी येथील १८ वर्षीय युवती घरातून अचानक बेपत्ता झाल्याची घटना २१ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली. कुटुंबीयांनी घरासह शेजारी व गाव परिसरात शोध घेऊनही ती आढळून न आल्याने मलकापूर ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी मिसिंगची नोंद केली आहे. शारदा बाबुराव सुरडकर, रा. लोणवडी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २१ ऑगस्ट रोजी…

Read More

महाविस्तार योजना अंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे धडे

*घिर्णी मलकापूर, दि. 11 ऑगस्ट 2026* : राज्य शासनाच्या “महाविस्तार” कृषी विस्तार योजनेअंतर्गत घिरणी येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय मलकापूर यांच्या वतीने मार्गदर्शन शिबिर व मोहीम दिवस साजरा करण्यात आला. महिन्याच्या प्रत्येक दुसऱ्या मंगळवारी हा मोहीम दिवस घेण्याचे ठरले आहे. या शिबिरात तालुका कृषी अधिकारी श्री. ललित सूर्यवंशी साहेब, मंडळ अधिकारी आर. टी. पवार आणि…

Read More
error: Content is protected !!