अंढेऱ्यात युवकाची आत्महत्या; पत्नीसह दोघांविरुद्ध गुन्हा
अंढेरा : वैवाहिक वादातून मानसिक त्रास देऊन युवकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत अंढेरा पोलिसांनी पत्नीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. अंढेरा येथील सूरज रामभाऊ तेजनकर यांनी २३ जुलै रोजी नातेवाइकाच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मृताची आई शशिकला तेजनकर यांच्या फिर्यादीवरून पत्नी वंदना सूरज तेजनकर…
