बनावट नोटांच्या आमिषातून शेतकऱ्याला लुटले; कुंड फाट्यावर थरार, सात जणांवर मलकापूर पोलिसांत गुन्हा दाखल!
मलकापूर : बनावट चलनाचा व्यवहार करून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका शेतकऱ्याला सापळ्यात ओढून चाकूचा धाक दाखवत रोख रक्कम लुटल्याची धक्कादायक घटना मलकापूर शहराजवळील कुंड फाटा परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी सात जणांसह एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध दरोडा, मारहाण व इतर संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवून मोठा मुद्देमाल जप्त केला आहे….
