बचत गटाच्या कर्जाच्या विवंचनेतून ४५ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या

पिंपळगाव राजा : बचत गटाच्या कर्जाची परतफेड आणि व्याजाच्या रकमेच्या चिंतेतून जळका भडंग येथील ४५ वर्षीय दगडू सुखदेव चंदनसे यांनी आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी, २७ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.

प्राथमिक माहितीनुसार, खामगाव-पिंपळगाव राजा मुख्य मार्गालगत असलेल्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दगडू चंदनसे शुक्रवारी सकाळी सुमारे ८ वाजता आढळून आले. बचत गटाकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड आणि त्यावरील व्याजाची रक्कम यामुळे ते आर्थिक विवंचनेत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पिंपळगाव राजा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. ठाणेदार भागवत मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करीत आहेत. आत्महत्येमागील नेमके कारण आणि कर्जासंदर्भातील परिस्थिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *