घरात घुसून विवाहितेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न; सासू-सासरे व पतीलाही मारहाण

मेरा बु. : मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून विवाहितेचा हात धरत पदर ओढून तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मेरा बु. येथे घडली. यावेळी विवाहितेच्या पतीसह सासू-सासऱ्यांनी विरोध केला असता, त्यांनाही शिवीगाळ व मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अंढेरा पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अंढेरा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २४ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री सुमारे २.३० वाजता आरोपी आकाश संजय पूरभे (रा. देऊळगाव घुबे) याने विवाहितेच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर विवाहितेचा हात धरून पदर ओढत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे. घरातील आवाजामुळे विवाहितेचे पती व सासू-सासरे जागे झाले. त्यांनी आरोपीला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली आणि चापटा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर विवाहितेने अंढेरा पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार यांनी आकाश संजय पूरभे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४, ११५(२), ३५१(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सिद्धार्थ सोनकांबळे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *