शेणखताच्या कारणावरून शेतातच राडा; शेतकऱ्यावर काठी-कुऱ्हाडीने हल्ला
खामगाव :- शेतातील शेणखत पांगविण्याच्या कारणावरून सुरू झालेला वाद जुना धुऱ्याचा वाद उकरून काढत थेट मारहाणीपर्यंत पोहोचला. हिवरखेड येथे एका शेतकऱ्यावर काठी व कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली असून, या प्रकरणी तिघांविरुद्ध हिवरखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दादाराव गोविंदा पारखे (वय ५५, रा. हिवरखेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमा…
