जांबुळधाबा येथील सोलर प्रकल्पावर चोरी; ८० हजारांच्या कॉपर केबलवर चोरट्यांचा डल्ला
मलकापूर : तालुक्यातील जांबुळधाबा शिवारातील सोलर ऊर्जा प्रकल्पातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ८० हजार रुपये किमतीची कॉपर डीसी केबल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र बळीराम विचवे (रा. गजानन नगरी, मलकापूर) हे एलिव्हेट मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीमार्फत जांबुळधाबा…
