अवैध देशी दारू विक्रीवर पोलिसांचा छापा; सात बाटल्या जप्त, एकावर गुन्हा
बुलढाणा : जानेफळ येथील इंदिरानगर परिसरात अवैधरित्या देशी दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करत सात देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी गोपनीय माहितीच्या आधारे इंदिरानगर परिसरात छापा टाकण्यात आला. पंचांसमक्ष करण्यात आलेल्या झडतीदरम्यान विलास कंकाळ…
