समृद्धी महामार्गावर स्कॉर्पिओ पलटी; युवक ठार, आठ जण गंभीर जखमी

सिंदखेडराजा : समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजा तालुक्यात भरधाव स्कॉर्पिओचा टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला, तर वाहनातील अन्य आठ जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णवाहिकेच्या मदतीने जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, गंभीर जखमी अमन साहू याचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत मृत्यू झाला.
समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉरच्या चॅनेलजवळ २३ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात घडला. सीजी ०८ बीसी ४४०५ क्रमांकाची स्कॉर्पिओ नाशिकहून नागपूरच्या दिशेने जात होती. दरम्यान, वाहनाचे पाठीमागील डाव्या बाजूचे टायर अचानक फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव स्कॉर्पिओ महामार्गावर पलटी झाली. या अपघातात अमन साहू (वय २५) याच्यासह तीकेस बंदे, रवी साहू, यश साहू, देवेश साहू, हेमंत विश्वकर्मा, वासू साहू, विकी साहू, किशन विश्वकर्मा आणि नवीन साहू हे जखमी झाले आहेत. यातील काही जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले. मात्र, अमन साहू याचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत मृत्यू झाला. या अपघातामुळे समृद्धी महामार्गावर काही काळ खळबळ उडाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!