Headlines

राकेश तलरेजा अॅसिड हल्ला प्रकरणाचा निषेध; २० नोव्हेंबरला मलकापूर बंद व मूकमोर्चा; महिना उलटूनही हल्लेखोरांचा शोध नाही; व्यापारी, सिंधी समाज, राजकीय व सामाजिक संघटना रस्त्यावर उतरणार

मलकापूर : शहरातील व्यावसायिक राकेश तलरेजा यांच्यावर झालेल्या अॅसिड हल्ल्याला महिना उलटूनही हल्लेखोरांचा शोध लागलेला नसल्याने पोलिसांच्या तपासावर नाराजी व्यक्त होत आहे. या घटनेतील आरोपींना तातडीने अटक करून न्याय मिळावा, या मागणीसाठी २० नोव्हेंबर रोजी मलकापूर शहरात मूकमोर्चा काढून शहर बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
व्यावसायिक तथा इस्टेट ब्रोकर राकेश मोहनदास तलरेजा यांच्यावर महिनाभरापूर्वी घराजवळ अज्ञात हल्लेखोरांनी अॅसिड फेकून हल्ला केला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. घटनेचे गांभीर्य आणि हल्ल्याची क्रूरता लक्षात घेता आरोपींचा तातडीने शोध लागणे अपेक्षित होते. मात्र, महिना उलटूनही हल्लेखोर मोकाट असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून, पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर व्यापारी संघटना, चेंबर ऑफ कॉमर्स, सिंधी समाज, विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने २० नोव्हेंबर रोजी शांततेच्या मार्गाने मूकमोर्चा आणि मलकापूर बंदचे आयोजन करण्यात आले आहे. अॅसिड हल्ल्यातील आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करावी आणि पीडिताला न्याय मिळवून द्यावा, ही या आंदोलनाची प्रमुख मागणी असून, या माध्यमातून पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *