मलकापूर : तालुक्यातील दाताळा येथून १८ वर्षे ३ महिन्यांची तरुणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. तरुणीला अज्ञात कारणासाठी फुस लावून पळवून नेल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला असून, गावातीलच एका तरुणावर संशय व्यक्त केला आहे. या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, त्यांची मुलगी १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास अज्ञात कारणासाठी फुस लावून पळवून नेण्यात आली. मुलगी घरी नसल्याचे लक्षात आल्यानंतर तिचा शोध घेतला असता, गावातील रोशन छगन इंगळे याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला. याप्रकरणी वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलिसांनी संशयित रोशन छगन इंगळे याच्याविरुद्ध अपराध क्रमांक २३९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १४०(३) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.