Headlines

मुलाच्या वाढदिवसानिमित्त संबारे दाम्पत्याचे रक्तदान; हनुमान सेनेचा सहयोग

मलकापूर : वाढदिवस साजरा करण्याच्या पारंपरिक पद्धतीला सामाजिक उपक्रमाची जोड देत बेलाड येथील शिवशंकर संबारे आणि हेमलता संबारे यांनी आपल्या मुलगा चि. अव्यय याच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करून समाजासमोर आदर्श निर्माण केला.

बुधवार, ४ नोव्हेंबर २०२६ रोजी मलकापूर येथील जीवन ज्योती ब्लड बँकेत संबारे दाम्पत्याने रक्तदान केले. समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा असेल, तर रक्तदानासारख्या उपक्रमातूनही वाढदिवस साजरा करता येतो, हा संदेश त्यांनी या कृतीतून दिला.

या रक्तदान उपक्रमाला हनुमान सेनेने सहकार्य केले. यावेळी हनुमान सेनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल भाऊ टप, अॅड. सचिन देशमुख, पत्रकार करण झणके, गौरव संबारे, प्रवीण खर्चे आदी उपस्थित होते.

वाढदिवसानिमित्त रक्तदान करून संबारे दाम्पत्याने सामाजिक बांधिलकी जपली. त्यांच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *