Headlines

राष्ट्रीय धोबी महासंघाच्या बुलढाणा जिल्हाप्रमुखपदी भिकू भातुरकर यांची नियुक्ती; वाढदिवसानिमित्त अनाथ आश्रमात भोजनदान

मलकापूर : राष्ट्रीय धोबी महासंघाच्या वतीने मलकापूर येथील भिकू सुपडाजी भातूरकर यांची बुलढाणा जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. १ सप्टेंबर २०२६ रोजी त्यांना नियुक्तीपत्र देत ही जबाबदारी सोपविण्यात आली.
समाजाच्या विकासासाठी तसेच समाजबांधवांच्या प्रश्नांसाठी काम करण्याची संधी मिळाल्याने भातूरकर यांनी या नियुक्तीबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांच्या नियुक्तीचे समाजबांधवांकडून स्वागत होत आहे.
दरम्यान, ६ सप्टेंबर रोजी वाढदिवसानिमित्त त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत अनाथ आश्रमात जाऊन भोजनदान केले. वाढदिवसाचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता गरजूंसोबत वाटून घेत त्यांनी सेवाभावी उपक्रमातून वाढदिवस साजरा केला.
नव्याने मिळालेली सामाजिक जबाबदारी आणि वाढदिवसानिमित्त केलेले भोजनदान, या दोन्ही उपक्रमांमधून भिकू भातूरकर यांच्या सामाजिक कार्याची सकारात्मक सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!